बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘विजय डोक्यात जाऊ देऊ नका’; मोदींचा ऑलिम्पिक विजेत्यांना कानमंत्र

नवी दिल्ली | टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने या ऑलिम्पिक स्पर्धेत 7 पदक जिंकली आहेत. या ऑलिम्पिक खेळवण्यात आलेल्या एकूण स्पर्धेत भारताच्या खात्यात 1 सुवर्ण, 2 रौप्य तर 4 कांस्यपदकं आली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक विजेत्यांशी संवाद साधला. त्यावेळी मोदींनी या ऑलिम्पिक विजेत्यांना कानमंत्र दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक खेळाडूंशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंचं कौतुक केलं. तर विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी प्रत्येक खेळाडूंच्या चर्चा करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सल्ले देखील दिले आहेत. सर्व खेळाडूंच्या तब्येतीची चौकशी केली आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले.

प्रत्येकाच्या मनात जिंकण्याची आशा असायला हवी. प्रत्येक खेळाडूने मेहनत करायला हवी. पराक्रम करावा मात्र निराशा मनात यायला नको. आयुष्यात जय पराजय होत असतात. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या खेळावर होऊ देऊ नका. विजेत्यांनी विजय डोक्यात जाऊ देऊ नका आणि पराजितांनी अपयश आणि हार कधीच मनात राहू देऊ नका, असा सल्ला मोदींनी या ऑलिम्पिक विजेत्यांना दिला आहे.

दरम्यान, खेळाडूंसह मोदींनी प्रशिक्षकांशीही संवाद साधला. त्यांचं देखील अभिनंदन केलं. त्यांचे अनुभव जाणून घेतले. मोदींनी हाॅकीच्या खेळाडूंशी देखील संवाद साधला. तुम्ही सर्वांनी मेजर ध्यानचंद यांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे, असंही मोदींनी यावेळी म्हटलं.

थोडक्यात बातम्या-

विवाहित महिला आणि अविवाहित पुरूषांमधील लिव्ह इन संबंध अवैध- उच्च न्यायालय

“आपला देशच भारीये, आपलं नशीब आहे की आपण भारतात राहतो”

“अफगाणीच लढायला तयार नाहीत मग आम्ही आमच्या सैनिकांचे प्राण संकटात का टाकू?”

“राज्यपाल महोदय आठवा महिना लागला, निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार?”

अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांबाबत मोदी सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More