Top News

सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका- शिवसेना

मुंबई | सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका, अशी खरमरीत टीका शिवसेनेने भाजपवर केली. कश्मीरमधील दहशतवाद्यांशी लढताना मिरा रोडचे मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुखपत्र सामानाच्या अग्रलेखातून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात सांगली, जळगाव महापालिका आणि राज्यसभेत उपसभापतीपद जिंकले, पण काश्मिरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार? आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार याचे उत्तर द्या? आणि मगच 2019च्या निवडणुकांना सामोरे जा, अशी टीका अग्रलेखात केली आहे. 

शहीदांना श्रद्धांजली वाहणं आणि पुष्पचक्र अर्पण करणं हेच जणू राज्यकर्त्यांचे काम झाले आहे. त्यातच ते समाधानी आहेत. सैनिकांच्या बलिदानानंतर डीजे वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नको, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-हिंसा करणाऱ्यांशी आमचा काही संबंध नाही- मराठा मोर्चा समन्वयक

-सनातनशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी धाड; 8 देशी बॉम्ब जप्त

-श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वक्तव्य

-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या