मुंबई | इंग्लंडमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा जास्त बाऊ करु नका त्याऐवजी शाससाने कोरोनानंतरच्या उपचारासाठी पोस्ट कोविड क्लिनिक उभारावेत, असा सल्ला ऑर्गनाईझड मेडिसिन ॲकॅडेमिक गिल्ड ओमॅग संस्थेने दिला.
नव्या कोरोना विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात मृत्युची संख्या वाढली असल्याचा कोणताही दावा समोर आला नसल्याचं युक्रेनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रा. किस व्हिट्टी यांनी दिलं आहे.
कोरोनातून वाचलेल्या नागरिकांना मानसिक आणि शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने संबंधितांसाठी पोस्ट कोविड क्लिनिक सुरू करण्याची गरज ओमॅगचे महासचिव डॉ. ईश्वर गिलाडा यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये अनेक समस्या दिसून येत आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याची गरज आपल्याला आहे. कोरोनातून बरे झाल्यावर रूग्ण माणसिक तणावामध्ये बडाल्याचं दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या मृत्यु दराकडे लक्ष न देता त्यांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या जीवनाकडे लक्ष द्यायला हवं, असं डॉ. ईश्वर गिलाडा यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
सुरेश रैना, गुरु रंधावाला मुंबई पोलिसांकडून अटक; रॅपर बादशहाचा पळून जाण्याचा प्रयत्न
नवीन कोरोना किती धोकादायक आहे?; AIIMSचे संचालक म्हणतात
पुण्यात पुन्हा दिसला गवा; वनविभागानं नागरिकांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन
फक्त इंग्लंडच नाही तर ‘या’ देशांमध्येही झालाय नव्या कोरोनाचा प्रसार
“ब्रिटनमधील नवीन विषाणूचे अस्तित्व अनेक देशात असण्याची शक्यता”
‘सध्याची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर नाही पण…’; कोरोनाच्या नव्या विषाणूवर WHO दिली महत्वाची माहिती