विराट म्हणतोय, “भारतात बनवलेल्या बॉलनं खेळायला नको!”

मुंबई | भारत विरुद्ध विंडिज दुसरा टेस्ट सामना आहे. त्यापुर्वी कर्णधार विराटने भारतात बनवलेल्या बॉलपेक्षा दुसऱ्या बॉलने टेस्ट क्रिकेट खेळवण्यात यावं, अशी अजब मागणी केली आहे. 

इंग्लंडमध्ये बनवल्या जाणाऱ्या ड्युक बॉलनं कसोटी सामने खेळवण्यात यावेत, अशी मागणी विराटने केली आहे. भारतात क्रिकेटमध्ये एसजी बॉलचा वापर होतो. विराटने एसजी बॉलच्या खराब गुणवत्तेवर आक्षेप घेतला आहे.

एसजी बॉल पहिल्या 5 ओव्हरमध्येच घासला जातो. याआधी या बॉलची गुणवत्ता चांगली होती. आता मात्र यात काय बदल झालेत मला माहित नाही, असं विराटने सांगितलं. 

दरम्यान, यापुर्वीही भारतीय गोलंदाज अश्विनने एसजी बॉलच्या गुणवत्तेवर आक्षेप घेत कुकाबुरा बॉलचा वापर करण्याची मागणी त्याने केली होती. विराटने त्याचेही समर्थन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही- मुख्यमंत्री

-राष्ट्रवादीने भाजपवर आरोप केले, मात्र आता आव्हान स्वीकारणार का?

-#MeToo | पत्रकार इतक्याही काही निरागस नसतात; भाजपच्या महिला नेत्याचं वक्तव्य!

-मनसेच्या इंजिनात पुन्हा इमकमिंग सुरू; शिवसेना,राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

-…असं छापलं जात असताना राज्याचं शिक्षण खातं झोपा काढत होतं का?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या