महाराष्ट्र मुंबई

“जोपर्यंत वीज बिल 50 टक्के माफ होत नाही, तोपर्यंत ती भरू नका”

मुंबई | वीजबिलाची मोठी रक्कम जनता भरू शकत नाही. त्यामुळे सरसकट सामान्य जनतेला वीजबिल 50 टक्के माफ करावं, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

वीज वापरली हे खरं असलं तरी लॉकडाऊनच्या काळात जनतेला रोजगार काम धंदा आर्थिक उत्पन्न नसल्याने गरीब सामान्य माणसांचं हित पाहणं राज्य सरकारचं काम आहे, असं आठवलेंनी म्हटलंय.

वीज वापरली आहे तर सर्व वीज बिल भरा ही राज्य सरकारची भूमिका चुकीची आहे. माझं जनतेला आवाहन आहे की जो पर्यंत वीज बिल 50 टक्के माफ होत नाही तो पर्यंत वीजबिल भरू नये, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

दरम्यान, वाढीव वीज बिलांसदर्भात भाजपने देखील सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण

धक्कादायक! मुंबईत 2 अल्पवयीन मुलांनी केला तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, कारण…- चंद्रकांत पाटील

राज्यपाल समजूतदार आहेत, आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर लवकरच निर्णय घेतील- छगन भुजबळ

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या