मुंबई | राज्यात सध्या राजकीय खेळ चांगलाच रंगला असून विविध मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अशातच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात कार्यक्रमात बोलताना राजकीय वातावरणाविषयी वक्तव्य केलं.
आज भारतामध्ये चुकीचे विचार पसरवले जात आहेत. त्यांनी लगतच्या देशांची परिस्थिती पहावी. केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
देशात विविधतेत सौंदर्य आहे आणि ते सांभाळायचं असेल तर विविध धर्माची फुलं आहेत ती सांभाळायला हवी. जगात, देशात काही परिस्थिती असो आम्ही मात्र आमच्या भागात एकतेचा संदेश देतो, असंही पवार म्हणाले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा राज्यभर गाजत असून याचे पडसाद पहायला मिळत आहेत. या मुद्द्यावरुन राज्यभर गोंधळ उडाला आहे.
थोडक्यात बातम्या –
“उद्धव ठाकरेंच्या सभेला मैदान कमी पडेल, एवढी गर्दी होईल”
राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्या पटोलेंना अजित पवारांचं खोचक प्रत्युत्तर, म्हणाले…
“शरद पवार मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी आतापर्यंत पाचवेळा माफी मागितली असती”
“कुत्रा आहे, भुंकतोय, जे पण भुंकतोय ते भुंकू द्या”
‘महाविकास आघाडी सरकार टिकवायचं असेल तर…’; शिवसेना आमदाराचा गंभीर इशारा
Comments are closed.