पंतप्रधानपदावर 12 वी पास व्यक्ती बसवू नका; अरविंद केजरीवालांचा मोदींवर निशाणा

नवी दिल्ली | 12 वी पास असलेली व्यक्ती पंतप्रधानपदावर बसवू नका, असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.

2014 च्या निवडणुकीत 12 वी पास असलेली व्यक्ती पंतप्रधानपदी बसवली मात्र या निवडणुकीत एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला संधी द्या, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

राफेल करारामधील सत्य बाहेर आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल, असं देखील अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं अरविंद केजरीवालांनी कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘अजित पवारांना हवीय राज ठाकरेंची साथ’, मात्र राष्ट्रवादीतून होतोय विरोध!

-नोटाबंदीदरम्यान किती मृत्यू झाले? PMO म्हणतं आम्हाला माहिती नाही…!

नेत्यांच्या मुलाकडे की सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे; राष्ट्रवादीचं युवक प्रदेशाध्यपद कुणाकडे?

-यांच्याशिवाय ‘बेस्ट कपल’ कुठलं? ‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी धनंजय मुंडेंचा सेना-भाजपवर प्रहार

मुख्यमंत्र्यांमुळे मराठा समाजाला न्याय, शिवसेना आमदाराची फडणवीसांवर स्तुतीसुमनं

Google+ Linkedin