Top News देश

‘आता लव्ह लेटर पाठवू नका’; शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावलं

नवी दिल्ली | गेले 28 दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. मात्र चर्चेसाठी तेच तेच प्रस्ताव सरकार पाठवत असल्यामुळे शेतकऱ्यांचा भडका उडाला असून, आता ‘लव्ह लेटर्स’ पाठवू नका, असं मोदी सरकारला सुनावलं आहे.

कृषीमंत्रालयाचे सहसचिव विवेक अग्रवाल यांनी शेतकरी नेत्यांना पत्र पाठवलं. आज 40 शेतकरी संघटनांच्या नेत्यांची सिंघू सीमेवर बैठक झाली. या बैठकीत सहसचिव अग्रवाल यांच्या पत्राला लेखी उत्तर देण्यात आले आहे.

सरकार एक पाऊल पुढे टाकत असेल तर शेतकरी दोन पाऊले पुढे टाकण्यास तयार आहे. पण सरकारने ‘लव्ह लेटर्स’ पाठवणं थांबवलं पाहिजे. तीन कृषी विधेयके रद्द करावी या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, असं स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव म्हणाले.

शेतकऱ्यांचे आंदोलन हाणून पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण यात सरकारला यश येणार नाही. कृषी कायदे रद्द करा, या भूमीकेवर शेतकरी ठाम आहेत, असंही योगेंद्र यादव यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नाशिकमध्ये कोरोनामुळे 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू!

“कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, आता जास्त काळजी घ्यावी लागेल”

पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश राजकीय हेतूने- चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा बातचितचा प्रस्ताव फेटाळला!

कोरोनाच्या आणखी एका प्रकारानं ब्रिटनमध्ये हाहाकार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या