…या सर्व्हेबद्दल मिडियासमोर अवाक्षरही काढू नका; मुख्यमंत्र्यांची तंबी

मुंबई | भाजपच्या आमदार-खासदारांची राज्यातील कामगिरी कशी आहे, याबद्दल भाजपच्यावतीने एक गुपचूप सर्व्हे करण्यात आला होता. याबद्दल मिडीयासमोर अवाक्षरही काढू नका, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी आमदार- खासदारांना दिली असल्याचं समजतंय.

भाजपने दिल्लीतील चाणक्य या संस्थेकडून आमदार खासदारांच्या कामगिरीबद्दल गुपचूप सर्व्हे केला. या सर्व्हेत राज्यातील भाजपचे 40 टक्के आमदार धोक्यात आहेत. फ्री प्रेस जर्नल या दैनिकाने याबाबत वृत्त छापलं आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदार खासदारांना बंद लिफाप्यात त्या भागातील निष्कर्ष सोपवले आणि घरी जा, लिफाफा बघा मात्र मिडीयासमोर याबद्दल अवाक्षरही काढू नका, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपचा गुपचूप सर्व्हे; 40 टक्के आमदार धोक्यात!

-डोकी फोडल्याशिवाय आणि तुकडे पाडल्याशिवाय न्याय मिळत नाही!

-भाजपचे 6 खासदार डेंजर झोनमध्ये; पत्ता कट होण्याची शक्यता?

-#MeToo | …तर मी महिलांच्या पाठिंशी खंबीरपणे उभा असेन- अमिताभ बच्चन

-#MeToo | ‘या’ प्रसिद्ध कर्णधारावर एअर होस्टेसचा विनयभंगाचा आरोप