बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलं पाहिजे, रस्त्याच्याकडेला उभं राहून पाहणी करू नका”

परळी | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आणि गुलाब या चक्रीवादळाचा राज्याला फटका बसताना दिसत आहे. राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मराठवाड्यात प्रमाणाबाहेर पाऊस पडत अतिवृष्टी झाली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने बीड दौऱ्यावर होते. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे.

रस्त्याच्या कडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका, म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी जयंत पाटलांसह धनजंय मुंडेंना चिमटा घेतला आहे. तसेच, मराठवाड्यातील पूरपरिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या कठीण पूरपरिस्थितीत प्रशासनासोबतच शासनानं शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलं पाहिजे, असं मुंडे म्हणाल्या आहेत.

पूरामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. जयंत पाटलांकडे जलसंपदा खातं आहे, जर त्यांनी ठरवलं तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल. मराठवाड्यास न्याय देण्यासाठी जयंत पाटील पावलं उचलतील अशी अपेक्षा मला आहे. अल्पभुधारक शेतकऱ्यांना अन्न धान्य द्यावे आणि सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे.

दरम्यान, काल जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील पक्षाच्या संवाद यात्रेनंतर काल पालकमंत्री धनजंय मुंडेंसोबत जिल्ह्याच्या अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला आहे. तसेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या बाबतीत आढावा बैठक काल रात्री उशिरा पार पडली.

थोडक्यात बातम्या –

‘उसूलो पर आंच आए तो टकराना जरुरी है’; राजीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी सोडलं मौन!

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

‘जर एखादं गटारातून बाहेर येत नाल्यात पडत असेल तर…’; कन्हैया कुमारच्या पक्षांतरावर भाजपची टीका

‘या’ गोष्टीमुळे गुगलचे मॅनेजर सुंदर पिचई दिवसभर असतात एनर्जेटीक, जाणून घ्या!

‘बांधावर जायच्या आधी जयंत पाटील चंद्रावर…’; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More