बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरेंचं मला सांगू नका माझा मुलगा पालिकेच्या शाळेत शिकत आहे”

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र प्रवेशपूर्व परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांवरच घ्यावेत, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

या सर्व विषयावर विरोधी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा असा निर्णय येईल असं वाटलं नव्हतं. अकरावी प्रवेशाच्या प्रवेशपूर्व परीक्षेचा निर्णय जरी रद्द झाला असला तरी यामध्ये शिक्षण कुठेच थांबणार नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलं खाजगी शाळेत शिकलीत याबाबत विचारलं गेलं तर त्यांच्या मुलांचं मला सांगू नका, माझा मुलगा पालिकेच्या शाळेत शिकत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी कुठेही अडचण येणार नाही. जर जागा कमी पडल्या तर जागा वाढवू पण एकही विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी शुल्क भरलं आहे, त्यांना ते परत मिळेल, असंही बच्चू कडू म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

“आम्ही तलवार, बंदुका घेऊन लढणारे, आज मराठा रस्त्यावर आंदोलन करतोय हे देशाचं दुर्देव”

‘तुमची इयत्ता कंची ?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

सीमाभागातील गावे तात्काळ महाराष्ट्रात सामील करण्यात यावीत; अजित पवारांचं पंतप्रधानांना पत्र

ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्युबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावरून संसदेत केंद्राचा ‘यु-टर्न’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More