बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला हात लावायचा नाय’; आघाडी सरकारमधील आजी-माजी आमदारांची जुंपली

जुन्नर | शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद आपल्याला काही नवा नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये नेहमीच वाद-विवाद होत असलेले पहायला मिळतात. अशातच सध्या पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमधील वाद प्रकर्षानं दिसून आला.

नुकतंच शिवसेनेत प्रवेश केलेले शरद सोनवणे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यात भर कार्यक्रमात बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं. एवढंच नाही तर त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर-2 गावात रस्त्याच्या भुमीपूजनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. अप्रूवलची तारीख मला पाहिजे, असं म्हणत शरद सोनवणे यांनी अतुल बेनके यांच्या हाताला हात लावला होता. त्यानंतर अतुल बेनके आक्रमक झाले आणि मला हात लावायचा नाय असं म्हणाले. त्यानंतर तुम्ही माझ्या शेजारी का बसला?, असं प्रत्युत्तर शरद सोनवणे यांनी दिलं. त्यामुळे तेथील वातावरही चांगलंच तापलेलं पहायला मिळालं.

दरम्यान, मला उद्घाटनाची काही हौस नाही. खुर्ची गेली पण आम्ही बेअक्कल नाही. आपले कर्तृत्व किती आपण बोलतो किती, असा टोला देखील शरद सोनवणे यांनी बेनके लगावला आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या – 

‘मी कधीच बेसावध नसतो’; भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक

बुस्टर डोसविषयी महत्त्वाची घोषणा, राजेश टोपे म्हणाले…

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ब्रिजला गाडीची धडक झाल्यानं चौघांचा मृत्यू

‘ज्याला दाखवायचं आहे त्याला मी…,’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

अनाथांची माय! सिंधुताई सपकाळ अखेर अनंतात विलीन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More