Top News देश राजकारण

पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढू नका; तेजस्वी यादव यांचा नेत्यांना इशारा

बिहार | आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एकूण 243 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे.

दरम्यान तेजस्वी यादव यांनी विरोधकांविरोधात घोषणाबाजी न करण्याची ताकीद देण्यात आलीये. शिवाय पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नये असंही तेजस्वी यांनी आपल्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं आहे.

तेजस्वी यादव म्हणाले, निवडणुकीचा निकाल काहीही आला तरी कोणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही. अनेक नेते कॅमेऱ्यासमोर पंतप्रधान मोदींविरोध बोलत असून ते योग्य नाहीये.

यापूर्वी निवडणुकीत आपला विजय झाला तरीही कोणीही फटाके वाजवणार नाही. तसंच पराभव झाला तर रस्त्यावर येऊन हुल्लडबाजी करणार नाही, असं ट्विटरद्वारे तेजस्वी यादव यांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होईल- संजय राऊत

बिहार निवडणूक- महाआघाडीला लाडू पचणार नाहीत, शाहनवाज हुसैन यांची टीका

भाजपने मेधा कुलकर्णींना पुन्हा डावलले; विधान परिषदेची उमेदवारी नाहीच

 बिहार निवडणूक- निकालाआधीच पोस्टरबाजी; तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या