महाराष्ट्र मुंबई

पोलीस गणवेशावर टिळा, गंडा-दोरे नकोत; आयुक्तांचे आदेश

मुंबई | मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी आयुक्तपदाची धुरा हाती घेताच पोलीस दलाला शिस्त लावण्यास सुरूवात केली आहे. पोलीस गणवेशात टिळा, गंडा-दोरे बांधू नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत. 

पोलीस दलाची प्रतिमा जपण्यासाठी गणवेश स्वच्छ, नीटनेटका आणि इस्त्री केलेला असावा. कुठेही उसवलेला नसावा. त्यावर गळ्यात-हातात दोरे गंडे घालू नयेत. कपाळावर टिळाही नको, असं जयस्वाल यांनी जारी केलेल्या सुचनांमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, बुटापासून टोपीपर्यंत गणवेश कसा परिधान करावा?, याबाबतच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यात मध्यभागी लावाव्यात, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील अश्वाचा मृत्यू!

-अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना शिकवणार चाणक्य नीती!

-यशवंत सिन्हांचा मुलावर हल्लाबोल; जयंत सिन्हांना म्हटले नालायक!

-राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही- संभाजी भिडे

-मनू हा संत ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या एक पाऊल पुढे होता- संभाजी भिडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या