बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क नको, सोशल डिस्टन्सिंगही पाळू नका, लस घेतलेल्या नागरिकांसाठी ‘या’ देशाच्या नव्या सूचना!

नवी दिल्ली | जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच लस घेतलेल्या नागरिकांसाठी अमेरिकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे. मागच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीने नागरिकांना कमी गर्दीच्या ठिकाणी मास्क घातला नाही तरी चालेल, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांनी मास्क नाही घातला आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन नाही केलं तरी चालेल असं म्हटलं आहे.

दरम्यान, पूर्णपणे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी फक्त मास्क वापरावा, अशा सूचना सीडीसीतर्फे देण्यात आल्या होत्या. परंतु, आता नवीन नियमावलीनुसार देशातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये जा जर तुम्ही लसीकरण पूर्ण केलं असेल तर विना मास्क फिरू शकता आणि सोशल डिस्टंसिंगचं पालनही करावं लागणार नाही.

त्यामुळे आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना विना मास्क येता येणार आहे. तसेच ज्याठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे, तेथे मात्र नागरिकांना मास्क घालावाच लागेल, असं नव्या नियमावलीत म्हटलं आहे.

FDA ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील अमेरिकी मुलांना लस देण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच फायझर-बायोएनटेकने बनवलेली कोरोना लस ही 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना गुरुवारपासून देण्यात येणार आहे. यापूर्वी, इस्राएल हा देश मास्क फ्री  झाला होता. इस्राएलमध्ये जवळपास 81 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस देण्यात आले, त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला होता.

थोडक्यात बातम्या –

सर्वात प्रभावी Sputnik V लशीची किंमत जाहीर, इतक्या रुपयांना मिळणार!

“मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला अन्…”; पुष्कर जोगला रडू आवरेना

‘लव यू जिंदगी’ म्हणत ती धैर्यानं कोरोनाशी लढली, मात्र नियतीला काही वेगळंच हवं होतं!

‘या’ राज्यात पुन्हा मृत्यूचे थैमान! मध्यरात्री ऑक्सिजन संपला; 4 तासांत 13 रुग्णांचा मृत्यू

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More