बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आघाडीची चिंता न करता शिवसेना बळकट करा, शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा”

मुंबई | महाविकास आघाडीची सत्ता असली तरी मात्र त्यातील पक्षांचे प्रमुख नेते आपला पक्ष वाढवण्यावर भर देताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. अशातच मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना शिवसेना बळकट करण्याचा आदेश दिला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला.

कोरोना मुक्तीसाठी प्रत्येक गावात काम करा. माझं गाव कोरोनामुक्त गाव अशी मोहिम राबवा. गावागावांमध्ये शिवसंपर्क अभियान सुरू करा, जनतेची काम करा आणि पक्ष बळकट करा. 12 जुलै ते 24 जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. याबाबत खासदार अनिल देसाई माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.

प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त जनतेची कामं करा. शिवसेना पक्ष ही आपली जबाबदारी आहे. 1966 पासून आजपर्यंत आपण इथपर्यंत कसं आलोय ते जाणून घ्या, शिवसेनाप्रमुखांचा विचार घराघरात पोहचवण्याचं काम करा. निवडणुका येतील जातील. पण लोकांचा विश्वास संपादन करा, असं उद्धव ठाकरे मार्गदर्शन जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

दरम्यान,शिवसेनेसाठी स्वबळ म्हणजे पक्ष बळकट करण्याचे आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्वबळ वापरलं जातं. जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे महाविकास आघाडीचे तिन्ही नेतृत्व ठरवेल त्यानुसार शिवसैनिक काम करतील, असं अनिल देसाई म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

आयटी मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेताच अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरला खडसावलं

मुंडे भगिनी नाराज?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहित होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं”

शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही – नारायण राणे

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; भाजप नेत्याच्या ‘त्या’ ट्वीटवर उर्मिला मातोंडकर भडकल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More