मुंबई | राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र नागरिकांच्या बेफिकिरीमुळे डिसेंबर महिन्यानंतर राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात चार हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
6 फेब्रुवारी रोजी राज्यात चार हजारांच्या वर कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले. मास्क न घालणे, शाररिक अंतर न पाळणे, अनावश्यक गर्दी करणे त्याचप्रमाणे स्वच्छता न पाळण्याच्या हलगरजीपणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
मुंबईत रेल्वे सेवा सुरु केल्यानंतर गर्दीचे योग्यरित्या नियंत्रण करणे शक्य झाले नसल्यामुळं चार हजारांच्यावर कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आदि महापालिकांमध्ये नियमांचे पालन होत नसल्यामुळे तिथेही रुग्णसंख्या वाढत आहे.
दरम्यान, ठाण्यात 4740, पुण्यात 6216 तर नाशिकला 1379 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच विदर्भातील अकोला, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर या शहरांमध्ये वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात दीड महिन्यांमध्ये 38 जणांचा मृत्यू झाला असून, वर्धा जिल्ह्यातही दीड महिन्यात 46 मृत्यू झाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
न्यायव्यवस्था खरंच जीर्ण झालीय का?; शरद पवार म्हणतात…
शेतकरी आंदोलन: देशात असंतोष पसरवण्याचा आरोप, 21 वर्षीय दिशा रवीला अटक
नाद करा पण आमचा कुठं?; दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यानं हेलिकॉप्टर घेतलं
महाराष्ट्रातील ‘या’ शहरानं रचला इतिहास, पेट्रोलनं शतक ठोकलं!
प्रवासात आजपासून ‘ही’ गोष्ट अनिवार्य, अन्यथा भरावी लागेल दुप्पट रक्कम!