थायराॅईडची ‘ही’ लक्षण तुम्हाला नाहीत ना? आजच खात्री करुन घ्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | डायबेटीज (Diabetes) आणि बीपीच्या पेशंटसोबतच हल्ली थायराॅईडच्या (Thyroid) रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना थायराॅईड होण्याचं प्रमाण जास्त आहे. शरीरात आयोडीन कमी पडल्यानं थायराॅईडची समस्या उद्भवते. थायराॅईड कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होतो.

काही लक्षणांवरुन आपल्याला थायराॅईड झाला आहे का? याचा अंदाज आपण घेऊ शकतो. अचानक वाढत असलेलं वजन हे मुख्य लक्षण असू शकतं. अचानक वारंवार थकवा (Fatigue) येत असल्यास तसेच विनाकारण चिडचिड होत असल्यास थायराॅईडची समस्या असू शकते.

भुवया विरळ होणे किंवा झोप न लागणं ही देखील थाॅडराॅईडची लक्षण आहेत. अचानक नख ठिसूळ व्हायला लागणे किंवा केस कोरडे किंवा पातळ होणे, बद्धकोष्ठता (Constipation) यासारखी लक्षणं दुर्लक्ष करु नका. तुम्हाला पुढे भविष्यात याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या डाॅक्टरांना जाऊन भेटून त्यांचा सल्ला घ्या.

थायराॅईडवर उपचार केले जाऊ शकतात. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमता (Physical Ability), आजाराची तीव्रता, रुग्णाचं वय, थायराॅईडचा ग्रंथी या सगळ्या गोष्टींवर उपचार अवलंबून असतो. याची खात्री करुन घेण्यासाठी तुम्हाला टेस्ट करुन घेणं गरजेचं असतं. तसेच दर सहा महिन्यांनी थायराॅईडची तपासणी करणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या