Top News

अटलजींच्या निधनाचं वृत्त; दूरदर्शननं मागितली माफी

मुंबई | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झाल्याचं वृत्त सरकारी वृत्तवाहिनी दूरदर्शननं दिलं होतं. मात्र याप्रकरणी त्यांनी आता माफी मागितली आहे. 

अटल बिहारी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र दूरदर्शननं त्यांच्या निधनाचं वृत्त दिल्यानं संभ्रम निर्माण झाला होता. 

दूरदर्शननं दिलेलं वृत्त खरं मानून अनेक वृत्तवाहिन्यांनी वाजपेयींच्या निधनाचं वृत्त दिलं होतं. मात्र या वृत्तवाहिन्यांनी देखील हे वृत्त दाखवणं बंद केलं आहे. आज संध्याकाळी एम्स अधिकृत बुलेटीन जारी करेल, यामधून वाजपेयींच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहिती मिळेल. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नवाजु्द्दीन सिद्धीकीच्या ‘मंटो’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

-…म्हणून रणवीर-दीपिकाच्या लग्नात मोबाईल नेण्यास बंदी!

-अटल बिहारी वाजपेयींना नेमका कोणता आजार आहे?

-…त्यांना फक्त एकदाच भाषण करताना पाहण्याची इच्छा आहे!

-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या