हरारे | आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची सलामीवीर जोडी अॅरॉन फिंच आणि डॉर्सी शॉर्ट यांनी सर्वोच्च भागिदारी करण्याचा विश्वविक्रम रचला आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना 223 धावांची सलामी भागिदारी त्यांनी रचली. यावेळी अॅरॉनने 76 चेंडूत 16 चौकार आणि 10 षटकार मारत तब्बल 172 धावा केल्या. तर डॉर्सीने 42 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार मारत 46 धावा केल्या.
दरम्यान, टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 200 पेक्षा जास्त धावांची भागिदारी रचण्याचा मान फिंच आणि शॉर्ट जोडीने मिळवला आहे.
टॉप 5- पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च भागिदारी:
1. अॅरॉन फिंच आणि डॉर्सी शॉर्ट – 223 धावा
2. मार्टीन गप्टिल आणि केन विलियमसन – 171* धावा
3. ग्रॅमी स्मिथ आणि लुटस् बोस्मन – 170 धावा
4. रोहित शर्मा आणि केएल राहुल – 165 धावा
5. रोहित शर्मा आणि शिखर धवन – 160 धावा
महत्त्वाच्या बातम्या –
-…आणि फिंचच्या बॅटचं झालं धोपटणं; 76 चेंडूत चोपल्या 172 धावा
-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या पुतण्याची पिंपरीत हत्या
-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील
-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!
-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती