केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर अखेर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे!
नवी दिल्ली | योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोना मृत्यूमागे अॅलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचं मागे सांगितलं होतं. कोरोना रुग्णांवर अॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला होता. यासंदर्भात त्यांनी बाबा रामदेव यांना एक पत्र लिहिलं होतं. अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका करणं दुर्दैवी आहे. आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दुःखी झाले आहेत. कोरोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जणू देवदूत आहेत. अशा वेळेत आपण कोरोना योद्ध्यांचा अपमान केल्यानं खूप दु:ख झालं आहे, आपण या विषयावर गंभीरतेनं विचार कराल आणि कोरोना योद्धांचा सन्मान कराल. तसेच वादग्रस्त वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल, अशी अपेक्षा डाॅ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली होती.
डॉ. हर्षवर्धन आपलं पत्र मिळालं. त्यासंदर्भाने चिकित्सा पद्धतीवरील संघर्षाच्या या वादाला मी पुर्ण विराम देत आहे. मी माझं वक्तव्य मागे घेत आहे. आम्ही अॅलोपॅथीचे आणि आधुनिक उपचार पद्धतीचे विरोधक नाही. आम्ही हे मान्य करतो की जीव वाचवण्यासाठी आधुनिक अॅलोपॅथीनं खूप प्रगती केली आहे आणि मानव सेवा केली आहे. माझं वक्तव्य कोट केलं आहे, ते मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हाॅट्स अॅपवरील आलेला मेसेज वाचून दाखवलेलं आहे. यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे, असं म्हणतं त्यांनी आपलं वक्तव्य मागं घेतलं आहे.
दरम्यान, केंद्रीयमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे अखेर रामदेव बाबा यांनी अखेर आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे डाॅक्टर परिचारिका आणि डाॅक्टर संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचबरोबर देशभरातून त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात होता.
थोडक्यात बातम्या-
कर्मचार्यांच्या मृत्यूनंतरही पगार देणार, घर आणि मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च टाटा उचलणार
“वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाही”
कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट
टॅक्सी चालकाने भाडं नाकारलं अन् त्याच्यासोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार
Comments are closed.