Top News पुणे महाराष्ट्र

‘विश्वासाची वर्षपूर्ती’ म्हणत अमोल कोल्हेंनी सादर केलं एका वर्षाचं रिपोर्टकार्ड

पुणे  |  सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे मातब्बर नेते शिवाजी आढळराव पाटील यांना आस्मान दाखवत राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघांतून दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विजयला आज एक वर्ष होत असताना त्यांनी ‘विश्वासाची वर्षपूर्ती’ म्हणत आपलं रिपोर्ट कार्ड सादर केलं आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सार्थ निवडीला आज एक वर्ष पूर्ण होतंय. मतदारसंघातील बैलगाडा शर्यत आदिवासी बांधवांच्या रोजगार निर्मितीसाठी वनऔषधी संशोधन निमिर्ती केंद्र, पुणे नाशिक वाहतूकीचा कोंडी प्रश्न भक्ती-शक्ती क़ॉरिडॉर अंतर्गत पर्यटन विकास, शिवनेरीवरचा रोपवेचा प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडल्याचं त्यांनी सांगितलं.

किल्ले रायगड जसा 17 व्या शतकात होता त्याच पद्धतीने त्याची उभारणी केली जावी, शेतकऱ्याचे शेतीमाल आणि शेतीविषय प्रश्न, आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी विविध सूचना आणि उपाययोजना इत्यादी प्रश्न संसदेत मांडल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

आजच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिक आणि मतदारांचे आभार मानत संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले आहेत. तसंच जनतेने दाखवलेल्या विश्वास व प्रेमाबद्दल त्यांचा ऋणी राहिल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच आपण सर्वांनी दिलेल्या संधीचं आपल्या मतदारसंघासाठी सोनं करेन, असा शब्द अमोल कोल्हेंनी शिरूर मतदारसंघातील मतदारांना दिला आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

देशभरातून 13 लाख 54 हजार पेक्षाही अधिकजण उत्तर प्रदेशला परतले

धक्कदायक! फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह

तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात; मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या