डाॅ. अमोल कोल्हे यांना दिलासा, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरूच राहणार

पुणे | शिरूर लोकसभा मतदारंसघाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे प्रक्षेपण रोखता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केलं आहे.

खासगी वाहिन्यांच्या मालिकांवर कारवाई करणे अशक्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. डॉ. कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका एका खासगी वाहिनीवर सुरू आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे मतदारांवर प्रभाव पडेल अशी तक्रार करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने मात्र या मालिकेचे प्रक्षेपण थांबवणे अशक्य असल्याचे सांगितलं आहे.

दरम्यान, डॉ. कोल्हे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

महत्वाच्या बातम्या-

-“अजून पाच ते सहा दिग्गज नेते आणि त्यांची मुलं भाजपच्या वाटेवर”

-महाराष्ट्रात प्रितम मुंडे आणि पूनम महाजनांचं नाव निश्चित?

-राज ठाकरेंनी कुठेही एक जागा लढावी आणि डिपॉझिट वाचवून दाखवावं- विनोद तावडे

-कतरिनाला सलमान खानने 65 लाखांची कार गिफ्ट केल्याची चर्चा!

तरुण दिसण्यासाठी मायावती फेशियल करतात- भाजप आमदार