Top News मनोरंजन

डाॅ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार!

मुंबई | अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका फार गाजली होती. तर आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे छत्रपतींच्या भूमिकेतून लोकांसमोर येणारेत.

सोनी मराठीवर सध्या स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका सुरु आहे. या मालिकेद्वारे पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे शिवराय बनून येणार आहेत. अमोल यांना शिवराय साकारून मिळालेली लोकप्रियता आणि लोकाश्रय पाहता मालिकेच्या टीआरपीवर चांगला परिणाम झाला होता.

अमोल नुकतेच संभाजी बनून लोकांसमोर आले होते. त्यांना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून अनेक महिने लोटले आहेत. मात्र आता तोच आनंद प्रेक्षकांना पुन्हा एकदा घेता येणारे.

लवकरच शिवरायांच्या भूमिकेतून अमोल कोल्हे चित्रिकरणाला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळतेय.

महत्वाच्या बातम्या-

सर्वसामान्य नागरिकांआधी नेत्यांना कोरोना लस द्या; शिवसेना नेत्याची मागणी

…तर अमित शहांची देखील काॅलर धरु; राजू शेट्टींचा इशारा

“भाजप कार्यकर्ता नटी म्हणते मुंबई म्हणजे PoK, योगींनी सांगावं ते नेमके कुठे आलेत”

“…तर तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळं फासू”

ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या