विखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. भारती पवार यांनी घड्याळाची साथ सोडत भाजपचं कमळ होती घेतलं आहे.  दुपारी 1.30 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या भाजपत प्रवेश केला आहे.

भारती पवार यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती. यावेळी दिंडोरीची उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे.

भाजपचे दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी भारती पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आहे.

सुजय विखे, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नंतर भारती पवार देखील भाजपच्या वळचणीला गेल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी

-पार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत!

काँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे

मुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार?- उदयनराजे भोसले

-गौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश