मुंबई | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केलीये. 14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल, असं मुंडेंनी सांगितलंय.
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलंय.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करु असं आश्वासन दिलंय. कोरोनामुळे काही अडचणी आल्या आणि त्यामुळे काम रखडलं, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केलीये.
शुक्रवारी इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक महाविकास आघाडी सरकार 2023 पर्यंत उभारेल, अशा दावा सुळे यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या-
रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज गेला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ईडीकडून प्रताप सरनाईकांना तिसऱ्यांदा समन्स; 10 डिसेंबरला हजर राहण्याची सूचना
“मुख्यमंत्री महोदय, डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा”
रेखा जरे हत्याकांडप्रकरणी महत्त्वाची घडामोड; आता ही व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात
दिल जीत लिया दिलजीत!; शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी दिले 1 कोटी