Top News आरोग्य कोरोना रत्नागिरी

42 बालकांना कोरोनामुक्त करणाऱ्या रत्नागिरीतील डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू

रत्नागिरी | रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांचं निधन झालंय. त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु होते. ते 65 वर्षांचे होते. मुख्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत 42 चिमुकल्यांना कोरोनामुक्त केलं होतं.

काही दिवासांपूर्वी डॉ. मोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉ. मोरे रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून दाखल झाले होते. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत जिल्हा रुग्णालयात त्यांनी बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा केली. निवृत्तीनंतर लांजामध्ये काही काळ त्यांनी दवाखाना सुरू केला होता. नंतर ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात मानद बालरोगतज्ज्ञ म्हणून रुजू झाले.

गेल्या मार्च महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात सहा महिन्यांच्या एका बालकाला कोरोनाची बाधा झाली. त्याची आई कोरोनामुक्त होती. पण तिच्या बालकाला कोरोना झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करणं अत्यंत आव्हानाचं होतं. डॉ. मोरे यांनी त्या बालकाला कोरोनामुक्त केलं.

जुलै महिन्यात त्यांनी जिल्हा रुग्णालयातील मानद सेवा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचदरम्यान त्यांना स्वतःला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. मात्र, बुधवारी दिवसभरात त्यांची प्रकृती ढासळली आणि गुरुवारी पहाटे त्यांचं निधन झालं.

महत्वाच्या बातम्या-

….तेव्हा मी माझ्याच देशाला फसवत असल्यासारखं वाटतं होतं- इशांत शर्मा

‘भूमिपूजनाचा दिवस जगभरातील हिंदूसाठी ऐतिहासिक’; ‘या’ माजी पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया

“हिंदू सत्तेत असतील तरच मंदिरं वाचतील आणि धर्म सुरक्षित राहील”

पहिल्यांदा बोकड पार्टीवर ताव अन मग श्रीरामाचं नाव, धुळ्यातील भाजप कार्यकर्त्यांचा प्रताप!

बॉलिवूडला धक्का, अभिनेता समीर शर्माने गळफास घेऊन केली आत्महत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या