पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या विरोधकांकडून नानाविध आरोप करण्यात येत असतात. मात्र आतापर्यंत कुणी त्यांच्यावर शिवी दिल्याचा आरोप केला नसेल, मात्र आता यासंदर्भात एक आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्रसिद्ध भाषातज्ज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी यासंदर्भात नरेंद्र मोदींवर आरोप केला आहे. संसदेत शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना नरेंद्र मोदी यांनी या आंदोलकांना ‘आंदोलनजीवी’ म्हटलं होतं. हा प्रकार हेटाळणी करण्याचा असून ही एकप्रकारे शिवी असल्याचं गणेश देवी यांचं मत आहे.
आंदोलन करणाऱ्या लोकांना आंदोलनजीवी म्हणणं ही त्यांची एकप्रकारे हेटाळणी आहे, हा स्वातंत्र्य लढ्याच्या प्रक्रियेचा अपमान आहे. स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्र निर्मिती लढ्यात लढलेल्या लोकांना मोदींनी शिवी दिली आहे, असं गणेश देवी म्हणाले. ते यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत होेते.
एखाद्या निर्णयाला विरोध झाला तर पंतप्रधान दरवेळी काहीतरी नवीन टूम शोधून काढतात. पुस्तक किंवा एखाद्या चित्रपटातून एखाद्या जातीचा अपमान होतो तेव्हा लोकांच्या भावना दुखावतात, इथं तर संसदेच्या सर्वोच्च सभागृहातून मोदींनी सामान्य माणसाचा अपमान केला आहे, असं देवी म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंचं महत्त्वाचं पाऊल
भाजप खासदार असताना मोदींशी पंगा; आता ‘या’ काँग्रेस नेत्याचं थेट वाराणसीत आव्हान!
5 महिन्यांच्या तीरासाठी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांनीही दाखवली तत्परता!
“नरेंद्र मोदींचे अश्रू मगरीचे, राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का?”
सचिन तेंडुलकरला मोठा धक्का, मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबईकडून डच्चू!
Comments are closed.