बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतच्या जाण्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांची फेसबुक पोस्ट, तरूणांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतने अवघ्या 34 व्या वर्षी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी फेसबुक पोस्ट लिहीत नैराश्यातून जात असलेल्या व्यक्तींना तसंच तरूणांना एक सल्ला दिला आहे.

आजचं बदललेलं राहणीमान, उंचावलेली जीवनशैली, दिवसेंदिवस बदलती सामाजिक परिस्थिती, घेवघेणी स्पर्धा आणि नातेसंबंध या सगळ्यामुळे लोकांचं जगणं पार बदलून गेलं आहे. या स्पर्धेत टिकून राहताना बऱ्याचशा गोष्टींचा परिणाम आपल्या जगण्यावर होतोय याची अनेकांना कल्पना नसते. सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. यावरच डॉ. हमीद दाभोलकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

मन कितीही अस्वस्थ असेल तर जवळच्या मित्र मैत्रिणी, कुटुंबीय, तज्ज्ञ ह्यांच्याशी बोलूया, असा सल्ला त्यांनी दिला आहे. अडचणीमधून नक्की मार्ग निघू शकतो, असंही हमीद दाभोलकर यांनी म्हटलं आहे. डॉ. हमीद यांचा मानशास्त्रावर मोठा अभ्यास आहे. महाराष्ट्रातल्या तसंच देशातल्या अनेक भागांत जाऊन ते तरूणांना त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करत असतात.

करिअर करताना अनेकांना जीवघेण्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. यामध्ये काही जण टिकून राहतात. तर काही जण मात्र नैराश्यात जातात. आणि याच नैराश्यातून अनेक जण चुकीचा विचार करत अगदी टोकाचं पाऊल उचलतात. सुशांतने देखील असंच टोकाचं पाऊल उचलत आपल्या जीवन यात्रेला पूर्ण विराम दिला आहे.

सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो स्पेशल डॉक्टरांकडून उपचार देखील करवून घेत होता. त्याच्या घरात त्याचे वैद्यकीय उपचाराचे अहवाल आढळून आले आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

राष्ट्रवादीचा ‘या’ माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात खळबळ

‘आमची कधी भेट झाली नव्हती, पण…; सुशांतच्या मृत्यूवर लता मंगेशकरांनी व्यक्त केल्या भावना

महत्वाच्या बातम्या-

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला धक्का, म्हणाली…

सुशांतच्या आत्महत्येनंतर धनंजय मुंडेंची कोरोना वॉर्डातून भावनिक फेसबुक पोस्ट

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनं अक्षय कुमारला धक्का; म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More