Top News चंद्रपूर महाराष्ट्र

डाॅ. शीतल आमटे प्रकरणाचा तपास घातपाताच्या दिशेने?; १६ जण ताब्यात

चंद्रपूर | बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस घातपाताच्या दिशेने तपास करत आहेत. यासंदर्भात आनंदवनातील जवळपास 16 लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवलं आहे.

डॉ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला आहे. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असं बोललं जात असलं तरी पोलिसांनी या प्रकरणात तपासाला वेगळं वळण दिलं आहे.

डॉ. शीतल यांचा घातपात तर झाला नसावा, ही बाबही पोलीस पडताळून पाहत आहेत. यासाठी आत्महत्येपूर्वी शीतल यांना कोण भेटले, त्यांच्यात काय चर्चा झाली, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आनंदवनातील 16 जणांचे जबाब नोंदवले.

शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर काही गोष्टीसाठी आणि अवयव तपासणीसाठी फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सोमवारी पोलिसांना प्राप्त होण्याची शक्यता आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

”दिल्लीच्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल अधिक, हे सर्व भामटे लोक”

‘मी देशातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत उभा आहे’; रितेश देशमुखचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

‘सोशल मीडियावर फक्त रिकामटेकडे लोक असतात’; कंगणा राणावतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘मिळालेला मंत्रिपदाचा तुकडा जपण्यासाठी बच्चू कडू…’; भाजपची मंत्री कडूंवर जहरी टीका

“पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही काही जण वाहत्या गंगेत हात धुताहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या