बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर संजीवनी नाही, अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झालेत”

वर्धा | कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर हे संजीवनी नाही, अनेक कोरोना रूग्ण रेमडेसिवीर न घेताही बरे झाले आहेत, असं वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालचे अधीक्षक डॉ. एस. कलंत्री यांनी सांगितलं आहे.

रेमडेसिवीर हे औषध कोरोनावर प्रभावशाली ठरल्याचे सिद्ध झालेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालात ही बाब सिद्ध झाली आहे. गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्यांना रेमडेसिवीरचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, असं कलंत्री म्हणाले.

अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झाले असल्याचा अनुभव आहे. रेमडेसिवीर देण्यापूर्वी किडनी, लिव्हर चांगलं असणं आवश्यक आहे. लिव्हर खराब असेल, किडनी काम करत नसेल, डायलिसीस लागत असेल, ट्रान्सप्लँट झालेलं असेल, गंभीर स्वरूपाचे हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर दिल्याने तोटे होतात, प्रतिकूल परिणाम होतात. हृदयावरही प्रतिकूल प्रभाव होत असल्याचं प्रसिद्ध झालं आहे. सर्वांगीण विचार करुन रेमडेसिवीर द्यायला हव, असं मत कलंत्री यांनी व्यक्त केलं.

रेमडिसीवर देऊन मृत्यूदर, दवाखान्यातील जाण्याची वेळ, व्हेंटीलेटरवर जाण्याची वेळ टळत नाही. कोरोनाबद्दल भिती निर्माण झाली आहे. कोरोनाकरीता रेमडीसीवर म्हणजे संजीवनीच चित्र निर्माण झाले आहे. मात्र हे औषध रामबाण असल्याची भावना शास्त्रीय दृष्टीकोनातून योग्य नाही, असं डॉ. एस. कलंत्री यांनी म्हटलंय.

 

थोडक्यात बातम्या- 

“येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार”

‘मी देशसेवा केली, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही’; जवानाचा काळजाला पाझर फोडणारा आक्रोश

#सकारात्मक_बातमी | एक किडनी, HRCT स्कोअर 12; पुण्यातील आजींची कोरोनावर यशस्वी मात

गुजरातमधील कोविड सेंटरला आग, 12 लोकांचा होरपळून मृत्यू!

“मला रडू येतंय आणि मला झोप येत नाहीये, आमदार असल्याची लाज वाटतीये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More