नवी दिल्ली | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काल रात्री दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्यांच्या प्रकृतीविषयी देशभरात चिंता व्यक्त करण्यात येत होती. तसंच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देशभरात प्रार्थना देखील केली जात होती. आता त्यांच्या तब्येतीविषयी नवी माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं एम्समधल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली असल्याचं एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. एएनआयने ट्विट करत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं ट्विटरद्वारे सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित; रायगडची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल
उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधानांचा आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद; ‘लॉकडाऊन’सह या प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा
जागतिक संकटात सरकारचं नेतृत्व भक्कम असावं लागतं; ओबामांचा ट्रम्प यांच्यावर निशाणा
घराच्या बाहेर पडण्यास सक्त मनाई…पुण्यातील कंटेनमेंट झोनसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
Comments are closed.