बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली |  देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्समध्ये अ‌ॅडमिट करण्यात आलं आहे.

आज संध्याकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ एम्समध्ये आणण्यात आलं. एम्समधले डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार सध्यातरी मनमोहन सिंग यांना रूग्णालयात भरती करण्यात आल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यांच्या तब्येतीविषयी पुढील माहिती कळण्यास आणखी वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, युपीए सरकारचा डोलारा त्यांनी 10 वर्ष आपल्या खांद्यावर पेलला होता. 2004 ते 2014 यादरम्यान त्यांनी भारताचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. तसंच अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची जगभरात विशेष ख्याती आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित; रायगडची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल

उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 399 जणांना डिस्चार्ज; पाहा तुमच्या भागात किती नवीन रूग्ण सापडले…

मजुरांच्या तिकीटाचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून देणार; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

निवृत्तीबद्दल रोहित शर्माने केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More