बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी स्वतःला भाग्यवान समजतो…, शिक्षण क्षेत्रात डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे काम उल्लेखनीय – चंद्रकांत पाटील

पुणे | डाॅ. राजेंद्र विखे पाटील यांचा षष्ट्यब्दीपूर्ती अभिष्टचिंतन सोहळा आज पुण्यात पार पडला. अधिसभेच्या निमित्ताने हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा कार्यक्रम पार पडला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न झालं. त्यावेळी अनेक नेत्यांनी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या कार्याचं कोतूक केलं आहे.
ग्रामीण भागातील लोणी प्रवरा सारख्या गावात डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी शिक्षणासह वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यासोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मोठे करण्याचे योगदानही त्यांचेच आहे. त्यांचा सत्कार करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या षष्टयब्दीपूर्ती निमित्ताने कौतूक केलं आहे.

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्याबरोबरच कठीण परिस्थिती असतानाताही त्यांनी शिक्षणाचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. त्यामुळेच हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी निर्माण झाली आहे. सामाजिक जीवनात काम करताना डॉ. विखे पाटील यांनी शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या षष्टयद्वीपूर्ती सोहळ्यात सहभागी होताना मला विशेष आनंद झाला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

शिक्षणासह वैद्यकीय क्षेत्रात काम करताना अनेकांच्या सहकार्यामुळे प्रवास सुखकर झाला. माझ्यावर प्रेम करणारे कुटूंब, नातलग, सहकारी, मित्र, अधिकारी, कर्मचाऱ्यामुळे शक्य झाले आहे, असं डाॅ. राजेंद्र विखे पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार देखील मानले.

या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या जडणघडणीत डॉ. विखे पाटील यांचे मोठे योगदान असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे विविध नाविण्यपुर्ण उपक्रमांची सुरुवात झाली असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आमचे तात्या फार लो प्रोफाईल आहेत. त्यांचं अत्यंत युगानुकूल व्यक्तीमहत्तव आहे. त्यामुळेच तात्याबरोबर असनारे त्यांच्यावर प्रेम करणारे आज याठिकाणी उपस्थित आहेत, असं म्हणत राजेश पांडे यांनी राजेंद्र विखे पाटील यांचं कौतूक केलं आहे.

दरम्यान, यावेळी समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, महापौर मुरलीधर मोहोळ, अनिल मस्के, सोमनाथ पाटील, अशोक सावंत, सुनेत्रा पवार, प्रवरा विद्यापीठाचे कुलगुरू मगरे सर उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

“कोल्हापूरचा गडी कोथरूडला आलाय, पण आमच्या अंगावर येऊ नका”

मोठी दुर्घटना! नदीत बोट उलटल्यानं 22 जण बुडाले

“अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत”

“केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येणं, ही फॅशनच झालीये”

“अजूनही मनुवादी जिवंत असल्यानं ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय’”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More