Top News

मला ‘मुन्नाभाई’ म्हणून हिणवता मात्र तुम्ही तर ‘भाई’ आहात- सुजय विखे

अहमदनगर | मला मुन्नाभाई म्हणून हिणवता, मात्र तुम्ही तर भाई आहात, अशा शब्दात भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला. ते शेवगावमध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

विरोधी उमेदवाराकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नाही. त्यामुळे ते फक्त आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहे, असा आरोप सुजय विखे यांनी केला.

मी विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जात आहे. पाणी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मी मांडत आहे. ही निवडणूक पुढच्या पिढीच्या भवितव्याची आहे त्यामुळे मतदान करताना विचार करा, असं सुजय विखे म्हणाले.

दरम्यान, सुजय विखे यांच्या प्रचारासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शेवगावला हजेरी लावली. सुजय यांच्यासाठी पंकजांनी दोन सभा घेतल्याने त्यांचं पारडं जड मानलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणं वृद्धास पडलं महागात

-प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा जास्त मतांनी डॉ. सुजय विखेंना निवडून द्या- पंकजा मुंडे

-जिथं कायदे बनतात तिथं कायदे मोडणाऱ्यांना पाठवणार का?; पंकजा मुंडेंचा सवाल

-राफेलचं प्रकरण…! आव्हाडांचं हटके अंदाजातील गाणं आणि भाजपला चिमटे

…तर मग त्यावेळी पवारांनी मोदींवर केस का ठोकली नाही- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या