बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर एकट्या मुंबईत 50 हजार लोकांना कोरोनाची लागण होईल- डॉ. तात्याराव लहाने

मुंबई | मुंबईकरांना घरात बसण्याची सवय नसल्यामुळे 3 मे नंतर जर लॉकडाउन मागे घेतला तर मुंबईत किमान 50 हजार लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते, अशी भीती राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली.

मुंबईतील रुग्णालयं रुग्णांसाठी अपुरी पडतील असा इशारा देतानाच मुंबईत किमान 20 लॉकडाऊन मे पर्यंत असला पाहिजे, अशी भूमिका डॉ लहाने यांनी मांडली.

3 मे रोजी लॉकडाउन मागे घेतला तर मुंबईत कोरोना वाऱ्यासारखा पसरलेला दिसेल. ‘स्थानिक लागण’ ते ‘सार्वत्रिक लागण’ हा माझ्या दृष्टीने चिंतेचा विषय असून किमान 20 मे पर्यंत मुंबईसह एमएमआर विभागात लॉकडाऊन वाढवला पाहिजे, असं लहाने म्हणाले आहेत.

दरम्यान, लॉकडाउन मागे घेताना लोक सोशल डिस्टंसिंगसह वेगवेगळ्या प्रकारची काळजी काटेकोरपणे घेतील हे पाहावं लागेल, असंही डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

पालघरमध्ये नेमकं काय घडलं?; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्र

‘उद्धव ठाकरे सरकार कुठे झोपलंय, त्यांना लाज वाटत नाही का’; बबिता फोगटची जहरी टीका

महत्वाच्या बातम्या-

राज्यपाल हे घटनात्मक पद, दबाव कशाला आणता? शेलारांचा राऊतांना अप्रत्यक्ष सवाल

आपण काय करतो याचं भान भाजप नेत्यांनी सोडू नये; गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

‘संतांची, वीरांची भूमी नाही तर …’; पालघर प्रकरणावर सुमित राघवन संतापला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More