Manoj Jarange | जरांगे पाटील यांना नेमकं झालं काय? मोठी माहिती समोर

Manoj Jarange | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील जिवाची परवा न करता, राज्यभर दौरा करत आहेत. आधी आंदोलन, नंतर 35 उपोषण आणि आता राज्यभर जाहीर सभा जरांगे पाटील घेत आहेत. दरम्यान बीड येथे जरांगे पाटील यांच्या सभेचं नियोजन करण्यात आलं होतं.

सभेत काय घडलं?

बीड जिल्ह्यातील अंबासाखर कारखाना येथे मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा सभा झाली. सभा सुरु असताना जरांगे पाटील थोडावेळ जागेवर बसले होते. त्यानंतर त्यांना आंबेजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यावेळी डाॅक्टरांनी जरांगे पाटील यांना महत्त्वाचा सल्ला दिला.

Manoj Jarange यांना डाॅक्टरांनी कोणता सल्ला दिला?

डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांना अशक्तपणा आला आहे. तसेच गेले काही दिवस जरांगे पाटील यांची दगदग झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर याचा परिणाम होत असल्याचं देखील डाॅक्टरांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, दौऱ्यामुळे जरांगे पाटील यांचं वेळेवर जेवण होत नसल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. जरांगे पाटील यांना आरामाची गरज आहे. त्यामुळे तीन महिने जरांगे पाटील यांनी आराम करावा.

जरांगेंना अचानक काय झालं?

बीड येथे जरांगे पाटील यांची जाहिर सभा पार पडली. सभेत बोलत असतना जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर जरांगे पाटलांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर सुद्धा जरांगे पाटील यांनी त्यांचं भाषण सुरु ठेवलं. मात्र अशक्तपणामुळे जरांगे पाटील यांनी स्टेजवर खाली बसून अर्ध भाषण केलं.

News Title : dr updates manoj jarange health

थोडक्यात बातम्या-

Sharad Pawar | ‘शरद पवारांनी राजकारणापासून दूर जावं’; वाढदिवशी कोणी दिला सल्ला?

Rajasthan CM | भाजपचा आणखी एक झटका; राजस्थानमधून मोठी बातमी समोर

Manoj Jarange | जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

Rashmika Mandanna | नॅशनल क्रश रश्मिकाचा नवा व्हिडीओ व्हायरल

Neena Gupta | ‘माझा एक्स बॉयफ्रेंड फुकटा होता, तो माझ्याकडे…’; नीना गुप्तांचा खुलासा