बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक सॅल्यूट! डॉक्टरचा मनाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एका डॉक्टरचा आहे. या व्हिडीओमध्ये एक डॉक्टर कोरोना रूग्णाची वेणी घालताना दिसत आहे. यामुळे व्हिडीओमधील डॉक्टरचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आयएएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर लोक या डॉक्टरचं खूप कौतुक करत आहेत.

केवळ उपचार हाच नाही तर कौटुंबिक प्रेमही आमचे कोरोना वॅरियर्स लोकांना वाटत आहेत, असं दीपांशु काबरा यांनी म्हटलं आहे.  गिर सोमनाथ जिल्ह्यातील आरोग्य सेवकाचा हा व्हिडिओ मनाला भिडणारा आहे. वैद्यकीय पथक अत्यंत तणावग्रस्त वातावरणात माणसांची सेवा करत आहे. त्यामुळे घरी रहा, कोरोना केसेस वाढू न देता मदत करा, असं आवाहन दीपांशु काबरा यांनी केलंय.

व्हिडीओमधेय पीपीई किट परिधान केलेली एक डॉक्टर आहे, जी समोर बेडवर बसलेल्या महिलेला व्यायाम कसे करावे हे शिकवत आहे. ती महिलासुद्धा पाहून व्यायाम करत आहेत. काही वेळानंतर ती डॉक्टर महिलेची वेणी देखील घालून देत असल्याचं दिसत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

रेमडेसिवीर मिळेना; हतबल आमदार महेश लांडगेंनी मागितली जनतेची माफी

‘त्यांना त्यांची जागा दाखवून द्या’; अमोल कोल्हे भाजप नेत्यांवर बरसले

गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवा देखील बंद करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

हुंड्यामध्ये बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाने भर वरातीत काढले कपडे अन्…

“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे अजित पवारांना माहिती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More