बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केबीसीमध्ये लखपती झालेल्या डॉ. दीपा शर्माचा दरड दुर्घटनेत मृत्यु

नवी दिल्ली | हिमाचल प्रदेशमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यु झाला आहे. किनौर जिल्ह्यामध्ये बटसेरीच्या गुंसा जवळ छितकुलहून सांगलाकडे जाणारी पर्यटकांची गाडी भूस्खलनात सापडली. पर्यटकांच्या गाडीवर मोठमोठी दगडी पडल्याने 9 जणांचा मृत्यु झाला. यामध्ये 2013 साली केबीसीमध्ये सहभागी झालेल्या डॉ. दीपा शर्मा यांचं निधन झालं आहे.

दीपा यांनी केबीसीच्या 7 व्या पर्वामध्ये सहभाग घेत 6.40 लाख रुपये जिंकले होते. दीपा यांचा मोठा भाऊ महाराष्ट्रातील विद्युत वितरण विभागात इंजिनिअर आहे. दीपा राहत असलेल्या शांतीनगरमध्ये शेजाऱ्यांनी दीपाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

कोरोनाकाळात दीपाने नागरिकांना मदत केली होती. दीपा यांचं पंचकर्म विषयात आपलं पदव्युत्तर शिक्षण झालं होतं. सोशल मीडियावर दीपा सक्रीय असायच्या. त्यांना ट्विटरवर 20 हजारापेक्षा जास्त लोक फॉलो करायचे.

दरम्यान, या दुर्घटनेत एका नेव्ही अधिकाऱ्याचा समावेश असून राजस्थानच्या सिकर येथील तिघांचा या दुर्घटनेत मृत्यु झाला आहे.एकूण 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 राजस्थानचे, दोन छत्तीसगढचे एक दिल्ली आणि एक महाराष्ट्राचा रहिवाशी असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

काय सांगता! कोंबडा गेल्यावर मालकाने वाजत-गाजत काढली अंत्ययात्रा

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात, वाचा आजची आकडेवारी

‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार’

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

घरात-दुकानात पाणी शिरलेल्यांना ‘इतक्या’ हजारांची मदत; ठाकरे सरकारचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More