बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिजीत बिचुकले म्हणतात, “मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता सलमान खानने सुरू केलेला टेलिव्हिजन शो बिग बाॅस भलताच प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर अनेक राज्यात अनेक भाषांमध्ये हे शो सुरू झाले. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. तर या लोकप्रिय बिग बॉसच्या 15व्या सीझनला काही आठवड्यांपूर्वी सुरूवात झाली आहे. या शो ला प्रसिद्ध करण्यासाठी बिग बाॅसमध्ये अभिजीत बिचुकलेंना वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. (Drama by Abhijeet Bichukale after wild card entry)

बिग बाॅसमध्ये अभिजीत बिचुकले यांचं व्हिआयपी स्पर्धक म्हणून आगमन झालं आहे. त्यामुळे आता बिग बाॅसच्या घरात मोठी खळबळ उडाल्याचं दिसून येतंय. रश्मी, देवोलीना, राखी आणि रितेश या स्पर्धकांनी धास्तीच घेतल्याचं चित्र आहे. अशातच आगमनानंतर अभिजीत बिचुकलेंनी राडा केला आहे. बिग बाॅसच्या घरात अभिजीत बिचुकले यांनी विरोधकांनी थेट इशारा दिला आहे.

मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असं बिचुकले यावेळी म्हणाले आहेत. सिंगल बेडवरून या दोन्ही बिचुकले आणि उमर यांच्या भांडणं सुरू झाली. त्यावेळी उमरने अभिजीत बिचुकले यांनी व्हिआयपी गेस्टवरून सुनावलं. त्यावेळी चांगलाच वाद पेटलेला पहायला मिळाला होता.

दरम्यान, मुळचं साताऱ्याचे असलेले अभिजीत बिचुकले स्वत:ला समाजसेवक आणि नेता मानतात. बिचुकले यांनी याआधी निवडणूक देखील लढवली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती होयचं स्वप्न असल्याचं  त्यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

अमृता फडणवीस राजकारणात येणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबईचं टेन्शन वाढलं! आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

काळजी घ्या! ‘या’ व्यक्तींना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा जास्त धोका

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More