…तर द्रौपदी मुरमू देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती ठरतील!

झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू

नवी दिल्ली | बाबरी प्रकरणी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावर खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर या दोघांचीही नावं राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं समजतंय. आता झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू यांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तसं झालं तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील. 

दरम्यान, देशाला वेगळा संदेश देण्यासाठी भाजप द्रौपदी मुरमू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या