बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय

नवी दिल्ली | 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठीची निवडणुक पार पडली. काँग्रेसचे यशंवत सिन्हा विरूद्ध भाजपच्या आदिवासी नेत्या द्रौपदी मूर्मू (Draupadi Murmu) अशी ही लढत होती. 21 तारखेला सकाळी 11 पासून मतमोजणी सुरु होती. काही वेळापूर्वी निकाल जाहीर झाला असून द्रौपदी मूर्मू विजयी झाल्या आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत.

द्रौपदी मूर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासुनच द्रौपदी मूर्मू आघाडीवर होत्या. त्या जिकण्याची अधिक शक्यता वर्तवली जात होती. काँग्रेसचे यशंवत सिन्हा यांचा त्यांनी पराभव केला आहे.

त्याच्या विजयापूर्वीच अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जात होता. दिल्लीत भाजप कार्यालयासमोर जल्लोष होत होता. मुंबईत भाजप कार्यालयासमोर तर नागपुरात आदिवासी बांधवांसोबत भाजपचा जल्लोष होत होता. सध्या भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

या निवडणुकीत महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त मत मिळवून देण्याचा दावा शिंदे-फडणवीस सरकारने केला होता. या निवडणुकीत क्रास व्होटींग झाल्याची माहिती समोर आली आहे. 17 खासदारांची क्रॉस व्होटींग केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यातील आता महाराष्ट्र राज्यातून किती मते फुटली हे समोर येणं बाकी आहे.

थोडक्यात बातम्या

“शिंदे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच तुम्ही लिहुन घ्या”

अत्यंत सुमार दर्जाचा ट्रेलर!, ‘मी पुन्हा येईन’ फ्लॉप होण्याची शक्यता

“मी इंदिरा गांधींची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही”

‘शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाही, तर…’; केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More