बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

15व्या राष्ट्रपती म्हणून दौपदी मुर्मूंनी घेतली शपथ, सर्वोच्चपदी झाल्या विराजमान

नवी दिल्ली | झारखंडच्या माजी राज्यपाल आणि देशातील ज्येष्ठ नेत्या दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती (President of India) म्हणून नवी दिल्लीतील संसद भवनात शपथ घेतली. देशाचे सरन्यायाधिश एन. व्हि. रमणा (N. V. Ramana) यांनी त्यांना शपथ दिली. देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी आज त्यांचा पदभार मुर्मूंकडे सुपूर्द केला. मुर्मू देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती (Second Women President of India) तर पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

संसदेत सकाळी 10.15 वाजता हा शपथविधी सोहळा सुरु झाला. यावेळी त्यांनी राजघाटावर महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) समाधीला पुष्पांजली वाहिली आणि तेथून त्या संसद भवनात दाखल झाल्या. तेथे देशातील मोठे नेते, केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री, तसेच मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या समवेत त्यांनी शपथ घेतली.

दौपदी मुर्मू या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या विरोधात निवडणूक लढल्या होत्या. त्यांना 64% मते मिळाली होती. दौपदी या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार होत्या. त्या आदिवासी (Tribal) समाजातील आहेत. त्यांचा ओडीसातील राइरंगपूर येथील सामान्य कुटुंबात जन्म झाला होता. तेथून पुढे त्या शिक्षिका झाल्या आणि हळूहळू राजकारणात पावले टाकत त्या आज देशातील सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या आहेत.

यापूर्वी भारताचे सर्व राष्ट्रपती हे स्वतंत्रपूर्व काळात जन्माला आलेले होते. मुर्मू या स्वतंत्र भारतात 1958 साली जन्मास आल्याने त्या स्वतंत्रपूर्व काळातील जन्माला आलेल्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या. त्या यापूर्वी 2015 ते 2021 साली झारखंड राज्याच्या राज्यपाल (Governor of Jharkhand) देखील होत्या.

थोडक्यात बातम्या – 

‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड

सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित

मोठी बातमी! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…

पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More