बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

द्रविडचा एक मेसेज अन् चाहरनं सामना पालटवला, वाचा नेमकं काय सांगितलं?

मुंबई | भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला. श्रीलंकेने दिलेल्या 276 धावांचं आव्हान पूर्ण करताना भारतीय फलंदाज लवकर बाद झाले. 116 धावांवर 6 गडी बाद अशी परिस्थिती असताना फलंदाजी करायला आलेल्या दीपक चाहरने कमाल केली. अखेरपर्यंत चिवड झुंज देत त्याने भारताला सामना जिंकून दिला. मात्र, या सामन्यात भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने दीपक चाहरला दिलेला सल्ला मोलाचा ठरला.

श्रीलंकेने दिलेल्या 276 धावाचा पाठलाग करताना भारतीय संघांची सुरवात खराब झाली. पृथ्वी शाॅ, ईशान किशन आणि कर्णधार शिखर धवन झटपट बाद झाले. त्यानंतर मनिष पांडे आणि सुर्यकुमार यादवने चांगली भागिदारी केली. मात्र त्यानंतर दोघे बाद झाले, त्यानंतर कृणाल पांड्याही बाद झाल्याने 193 धावांवर भारताचे 7 गडी बाद झाले होते. संघाला विजयासाठी 83 धावांची गरज होती आणि फक्त 3 गडी शिल्लक होते. सुरवातीला संयमी खेळी करणाऱ्या दीपक चाहरने आक्रमक फटकेबाजी सुरू केली, त्यावेळी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममधून बाहेर आला.

मैदानावर भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरची जोडी खेळत होती. राहुल द्रविड ड्रेसिंग रूममधून बाहेर येऊन राहुल चाहरच्या शेजारी येऊन बसला आणि राहुलला मैदानात एक मेसेज पाठवण्यास सांगितला. त्यानंतर षटक संपल्यावर राहुल मैदानात गेला आणि दीपक चाहरला द्रविडने दिलेला मेसेज पोहचवला. ‘तुला शेवटपर्यंत खेळायचंय…, सगळे चेंडू खेळून काढ’, असा मेसेज द्रविडने पाठवला होता. द्रविडने सांगितल्याप्रमाणे दीपक शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला आणि भारताला अशक्यप्राय वाटलेला सामना जिंकून दिला.

दरम्यान, भारताचा एक संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री देखील इंग्लंडमध्ये संघासोबत आहेत. त्यामुळे भारताच्या B संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे. T-20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीच्या जागी राहुल द्रविडची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

जगाचं टेंशन वाढलं!; कोरोना गेला नाही तेच नोरो व्हायरसचा धुमाकूळ

“लोकांच्या जीवापेक्षा सण महत्त्वाचे नाहीत”, कत्तलीसंदर्भात कोर्टानं फटकारलं!

खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जात केले गंभीर आरोप

मिकाचा राज कुंद्राला पाठिंबा; म्हणतो, “मी अॅप बघितलं, त्यात फार काही नव्हतं”

“लॉकडाऊन उठवा… अन्यथा रस्त्यावर उतरुन आम्ही स्वतः दुकानं उघडी करु”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More