विराट कोहलीनं काढलं, शाहरुख खाननं घेतलं; ‘हा’ खेळाडू पुन्हा IPLच्या रणांगणात!
मुंबई | इंडियन प्रीमीयर लीग 2021 स्पर्धा आता तोंडावर येऊन ठेपली आहे. 9 एप्रिलपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याने ‘आयपीएल’च्या या 14व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघांचे खेळाडूला तयारीला लागले आहेत. अनेक खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. तर काही खेळाडू सध्या क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करत आहेत.
कोलकाता नाईट राइडर्सच्या संघात असलेला दिग्गज फलंदाज रिंकू सिंह दुखापतीमुळे यंदाची ‘आयपीएल’ खेळणार नाहीये. त्याच्या जागेवर शाहरुख खानने गुरकीरत सिंह मान याला संघात जागा दिली आहे. 30 वर्षाचा गुरकीरत मूळचा पंजाबचा असून त्याने ‘आयपीएल’ मध्ये एकूण 41 सामने खेळले आहेत. त्याने 2012 मध्ये ‘आयपीएल’ मध्ये पदार्पण केलं होत.
गुरकीरत सिंह ‘आयपीएल’ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली डेयरडेविल्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोर कडून खेळला आहे. 2018 च्या ‘आयपीएल’ हंगामात गुरकीरतला एकाही सामन्यात खेळायला संधी मिळाली नव्हती. पदार्पण झाल्यानंतर त्याने प्रत्येक सिजनमध्ये 2 सामने खेळले आहेत. खेळलेल्या सामन्यात त्याने 511 धावा आणि 2 अर्धशतक केले असून 2 विकेट देखील घेतल्या आहेत.
दरम्यान, ‘आयपीएल’चे आयोजन करणाऱ्या ‘बीसीसीआय’ला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत दोघा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पण यापेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईतील वानखेडे मैदानावरील 8 ग्राउंड स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. या मैदानावर 10 ते 25 या कालावधीत आयपीएलच्या 10 सामन्यांचे आयोजन होणार आहे.
थोडक्यात बातम्या –
शेवटचं खेळताना पाहा; कारण ‘हे’ तीन दिग्गज पुन्हा IPL खेळण्याची शक्यता नाही!
“तुमचे चेहरे पाहून जगात कोरोना नसल्याची खात्री पटली, मीही मास्क काढून बोलतो”
महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट; एकाच दिवसात 10 हजार रुग्ण!
राहुल तेवतियाचा खतरनाक अंदाज, नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ तुफान व्हायरल
अवघ्या 12 वर्षांच्या मुलानं केली आत्महत्या, कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.