बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

DRDO चं ‘हे’ ॲंन्टी कोव्हिड औषध आजपासून बाजारात उपलब्ध शास्त्रज्ञ म्हणाले…

नवी दिल्ली |  देशभरात कोरोनानं थैमान घातलं असून या महामारीविरोधात लढण्यासाठी देशाला आणखी एक हत्यार मिळालं आहे. 2-डीजी हे औषध आजपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. 2-डीजी हे भारतीय शास्त्रज्ज्ञांनी बनवलेलं अँटी-कोविड औषध आहे. हे औषध  कोरोनाला हरवण्यासाठी मोठं शस्त्र ठरु शकतं. डीआरडीओच्या शास्त्रज्ज्ञांच्या संशोधन आणि मोठ्या परिश्रमानंतर भारतानं कोरोनाविरोधात हे औषध तयार केलं आहे. यातून लोकांना दिलासा मिळण्याची पूर्ण आशा आहे. आज या औषधाच्या 10 हजार डोसची पहिली खेप लॉन्च केली जाणार आहे.

डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की हे औषध रुग्णांना लवकर पूर्ववत होण्यासाठी मदत करतं. तसंच त्यांची ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकताही बरीच कमी होते. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आज  2-DG औषधाच्या 10,000 डोसची पहिली खेप लॉन्च केली जाईल आणि रुग्णांना हे दिलं जाईल.  हे औषध डॉक्टर अनंत नारायण भट्ट यांच्यासह शास्त्रज्ज्ञांच्या एका टीमनं बनवलं आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलमध्ये या औषधांचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत. मे ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या ट्रायलमध्ये या औषधानं कोरोना रुग्णांवर चांगलं काम केलं तसंच ते सुरक्षितही ठरलं. या औषधामुळं कोरोना रुग्ण लवकर बरे झाले तसंच त्यांना ऑक्सिजन सपोर्टची गरजही पडली नाही. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की हे औषध कोरोना विषाणूला जागीच थांबवतं आणि त्याचा प्रसार रोखतं. हे औषध एकप्रकारचं सूडो ग्लूकोज मोलेकल आहे.

दरम्यान, ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने 8 मे ला डीआरडीओनं विकसित केलेल्या अँटी कोविड औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. कोरोना विषाणूची मध्यम ते गंभीर लक्षणं असणा-या रूग्णांच्या उपचारासाठी या औषधास उपयुक्त पद्धत म्हणून परवानगी आहे. 2-डीजी औषध पावडर स्वरूपात येते. हे औषध पाण्यात मिसळून प्यावे लागते. कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर 2 डीजी या औषधाचे उपचार केले ते रुग्ण साधारण वेळेपेक्षा लवकर बरे झाले आहेत.

थोडक्यात बातम्या

“अजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन वापरून पुण्याला पळवला”

कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आरोग्य मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना ‘या’ नव्या आजाराचा धोका, नागपूरमध्ये रुग्ण वाढले

जोर लगाके हैशा! लोकं बघत राहिली पण युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं

नव्या फीचर्ससह शाओमी ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन रिलाँच करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More