बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दारू पिण्याचं वय केलं कमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | मद्यप्रेमीसांठी एक महत्वाची बातमी आहे. सरकारने मद्यप्रेमीसांठी कायद्यात मोठा बदल केला आहे. मद्यप्राशनासाठी वयोमर्यादा कमी करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मद्यप्राशनासाठीची वयोमर्यादा आता 25 वर्षांवरून 21 वर्ष करण्यात आली आहे. हरियाणा राज्यात 15 फेब्रुवारीपासून हे बदल करण्यात आले आहेत. हरियाणाच्या सुधारित उत्पादन शुल्क विधेयकाला राज्यपाल बंडारू दत्तोत्रय यांची परवानगी मिळाली आहे.

कायद्यात सुधारणा केल्यानंतर हरियाणा सरकारने या व्यवसायाची वयोमर्यादाही 25 वर्षांवरून 21 वर्ष केली आहे. शिवाय कलम 30 अंतर्गत 25 वर्षापेक्षा कमी वय असलेला व्यक्तीही मद्य विक्रीच्या दुकानात काम करू शकतो.

दरम्यान, अनेक राज्यात मद्य विक्री आणि खरेदीसाठी वयोमर्यादा ही 21 वर्षांची आहे. विधानसभा एक्साइज कायद्याच्या चार कलमांवर विचार केल्यानंतर हरियाणा राज्य सरकारनेही मद्य विक्री आणि खरेदीच्या कायद्यात हा मोठा बदल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

उर्फी जावेदचे ‘या’ दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली…

“उद्धव ठाकरे स्वत: दारू पित नाहीत, मग जनतेला वाईन का पाजत आहेत?”

दिशा सालियनला ‘त्या’ रात्री घेऊन गेलेली ती गाडी सचिन वाझेची?, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

… तर कोरोनाची आणखी एक लाट येईल, कोविड टास्क फोर्स अधिकाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती

“संजय राऊतांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्र्वरही करणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More