MPSC l कित्येक तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करत आहेत. अशातच रविवारी (1 डिसेंबरला) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पार पडली. मात्र या परीक्षेत विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांमुळे विद्यार्थी देखील गोंधळात पडले असून सध्या इतर प्रश्न-उत्तरांपेक्षा एका प्रश्नाची प्रचंड चर्चा सुरू आहे. मात्र या परीक्षेत नेमका काय प्रश्न विचारण्यात आला आहे हे आपण पाहुयात…
काय होता तो प्रश्न? :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र राजपत्रीत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 राज्यातील विविध परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत चक्क मद्यपानावर प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र तो प्रश्न आणि त्याच्या उत्तरासाठी देण्यात आलेल्या पर्याय चर्चेचा विषय बनत आहे.
तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल ? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
MPSC l पर्याय काय होते? :
1) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांना मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
2) दारू पिण्यास नकार देईन.
3) फक्त तुमचे मित्र मद्यपान करत आहेत म्हणून मद्यपान करेन.
4) नकार देईन आणि त्यांना खोटे सांगेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे.
मात्र हा प्रश्न आणि त्याच्यासाठी देण्यात आलेल्या चारही पर्यायांनी विद्यार्थ्यांना चांगलंच गोंधळात टाकलं होत. कारण ही परीक्षा उत्तीर्ण होणारे भविष्यातील शासनाचे क्लास वन अधिकारी असणार आहेत. त्यामुळे या परीक्षेत दारूसंबंधी प्रश्न विचारायला नको होता. तसेच हा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन नेमके काय? असा सवाल देखील विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय खरचं अशा प्रश्नांची गरज आहे का? असा प्रश्न देखील विद्यार्थी लोक विचारत आहेत.
News Title – drinking habit strange question ask by mpsc Exam
महत्त्वाच्या बातम्या-
अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार
कंबोज म्हणाले; “गजाभाऊला उचलून आणणार”; ठाकरे गटाचा नेता म्हणाला…
लग्नसराईत सोन्याची आनंदवार्ता; ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव
अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर?; आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता
राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?, संभाव्य नावे समोर