रखरखत्या उन्हात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ‘ही’ घरगुती पेय प्या!

Drinks for Hydrate

Drinks for Hydrate | यंदा फेब्रुवारी महिन्यातच सर्वाधिक तापमान वाढीची नोंद झाली. आता पुढील काही महीने उन्हाचा पारा आणखीच वाढणार असल्याचा अंदाज आहे. या काळात उष्माघात होण्याचीही अधिक शक्यता असते. त्यामुळे शरीराला थंड ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. (Drinks for Hydrate)

बरेच लोक अशा काळात घातक असलेले कोल्ड्रिंक्सचे सेवन करतात. पण, यामुळे शरीर आतून थंड होत नाही, तर शरीरातील उष्णता अजून वाढत जाते. त्यामुळे उन्हात भरपूर एनर्जी देतील, असे पेय पिले पाहिजे. तुम्ही काही घरगुती पेय पिऊन स्वतःला उष्माघातापासून वाचवू शकता, त्याबबात जाणून घेऊयात.

शरीराला हायड्रेट ठेवणारी पेय

लिंबूपाणी : व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू पाणी उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरते. ताजे राहण्यासाठी आणि उन्हाळ्यात एनर्जीसाठी लिंबूपाणी प्यायला पाहिजे. तसेच उन्हाळ्यात हृदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि लठ्ठपणा यासारख्या आरोग्य समस्यांपासूनही संरक्षण मिळते. संशोधनानुसार, दररोज लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास, मानसिक आरोग्य, पाचक आरोग्य आणि ऊर्जा पातळी राखण्यास मदत होते.

उसाचा रस : उन्हाळ्यात ठिकठिकाणी रसवंती गृह दिसून येतात. उसाचा रस शरीराला लगेच थंड करण्यास मदत करते. त्यात ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात आणि दिवसभर ऊर्जा देतात. इतकंच नाही तर साखरेपेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे ते मधुमेहींसाठीही सुरक्षित आहे.

ताक : ताक हे उन्हाळ्यात सर्वोत्तम पेय (Drinks for Hydrate )मानले जाते कारण ते संपूर्ण हंगामात शरीराला हायड्रेट ठेवते. ताक हे कॅल्शियमने समृद्ध असलेले दुग्धजन्य पदार्थ आहे, जे आपली हाडे मजबूत ठेवते. त्यात पाणी, लैक्टोज, केसिन आणि लैक्टिक ऍसिड देखील असते. यामुळे आतड्यात खराब बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. याचे सेवन केल्यास उन्हाळ्यात डिहायड्रेशन होत नाही.

नारळ पाणी : नारळ पाणी पिण्याचा उन्हाळ्यातील सर्वांत मोठा फायदा म्हणजे यामुळे शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. यामुळे अशक्तपणा आणि चक्कर यासारख्या समस्या दूर होतात.

टरबूजाचा रस: टरबूज (Drinks for Hydrate ) या रसाळ फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ते तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यात लाइकोपीन आणि अँटिऑक्सिडेंट असते, ज्यामुळे सूर्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण होते. यासोबतच शरीर थंड राहते.

Title : Drinks for Hydrate

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .