ऊस शेतीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई | ऊस लागवड करायची असेल, तर यापुढे त्यासाठी ठिबक सिंचन बंधनकारक असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. मात्र ऊसाला पाणी देण्यासाठी पाईपलाईन किंवा थेट पाट पाडून पाणी दिलं जातं. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं. तसंच जमिनीची धूपही होते.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे पाण्याची मोठी बचत होईल, असा दावा करण्यात येतोय. त्यामुळे राज्य सरकारने ऊसाच्या ठिबकसाठी २५ टक्के अनुदान देण्याचा निर्णयही घेतलीय. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या